Skip to main content

बाजी राउत, १३ वर्षीय हुतात्मा !


बाजी राउत, १३ वर्षीय हुतात्मा !

सर्वात प्रथम १३ वर्षीय बाजी राउत व त्यासोबत शहीद झालेले लक्ष्मण मलिक, फागू साहू, हर्षी प्रधान, नाता मलिक यांना शत शत नमन ! 

आज आपण उपभोगत असलेल्या स्वातंत्र्यासाठी “राष्ट्रप्रेम” ह्या अत्यंत पवित्र भावनेतूनकित्येकानी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे ! त्यातील कित्येकांना योग्य तो सन्मान मिळाला, परंतु अधिक प्रमाणात अनेकांच्या पदरी फक्त उपेक्षाच पडली हे स्वातंत्र्यउत्तोर काळात सिद्ध झाले आहे.
असाच एक उपेक्षित राहिलेला १३ वर्षीय क्रांतिकारक बाजी राउत, भारतातील सर्वात लहान हुतात्मा ! ज्याने अवघ्या १३ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली !

१९२५ साली ओरिसातील निलकंठपूर जिल्ह्यातील ढेंकानाल गावात बाजी राउतचा जन्म झाला. बाजी लहान असतांनाच त्याचे वडील हरिप्रसाद राउत यांचे निधन झाले, त्या पश्चात बाजीच्या आईने अत्यंत हलाखीमध्ये बाजीचे संगोपण केले. आईला मदत म्हणून बाजी लहान वयातच ब्राह्मणी नदीवर नौका वाहकाच काम करू लागला. लहानपणापासूनच बाजी आपल्या ढेंकानाल संस्थांनच्या राजाचा ( शंकर प्रताप सिंघ देव ) प्रजेवर होत असलेल्या निर्दयी अन्यायाला पाहत आला होता, व ह्या अन्यायाविरुद्ध गावातील “वैष्णव चरण पटनायक” यांनी राजाविरुद्ध बंड उभारले व प्रजामंडल नावाच्या संघटनेची स्थापना केली. आणि लहान बाजी ह्या संघटनेसाठी काम करू लागला !

प्रजामंडल संघटनेच्या सदस्यांनी राजाच्या विरोधात बंड उभारून राजाच्या नाकात दम आणला होता. वैष्णव चरण पटनायक यांच्या शोधात राजाचे सैनिक व ब्रिटीश पोलीस भुवन गावाच्या लोकांवर अनन्वित अत्याचार करत होते, कित्येकाना त्यांनी तुरुंगात डांबल. त्या विरोधात प्रजामंडल संघटनेच्या नेतृत्वात लोकांनी १० ऑक्टोबर १९३८ रोजी आंदोलन केले ज्यावर ब्रिटीश पोलीस व राजाच्या सैनिकांनी गोळीबार केला व त्यात २ गावकरी मृत्युमुखी पडले ! त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि राजचे सैनिक व  ब्रिटीश पोलीस आपला जीव वाचवण्यासाठी ढेंकानाल गावाकडे पळाले. त्यांना ढेंकानाल गावात जाण्यासाठी ब्राह्मणी नदीला ओलांडून जाणे गरजेचे होते व ते ११ ऑक्टबर१९३८ रोजी ब्राह्मणी नदीच्या किनारी नीलकंठ घाटावर पोहोचले. तिथे १३ वर्षीय बाजी नदीवर गस्त ठेवायचे काम करत होता. सैनिक व ब्रिटीश पोलिसांनी त्याला आपल्या नौकेतून ढेंकानाल गावात पोहोचवण्याचा आदेश दिला, परंतु १३ वर्षीय धीट बाजीने निर्भीडपणे त्यांना नकार देऊन गावातील लोकांना गोळा करण्यासाठी आरडाओरडा सुरु केला. १३ वर्षीय बाजीच्या ह्या विरोधाने चिडलेल्या ब्रिटीश पोलिसांनी बाजीवर निर्दयीपणे गोळ्या झाडल्या, ज्यात बाजी सोबत लक्ष्मण मलिक, फागू साहू, हर्षी प्रधान, नाता मलिक यांचा मृत्यू झाला ! ह्या लहान बालकांच्या बलिदानाने देशभरात संतापाची लाट उठली व स्वातंत्र्य संग्रामच्या चळवळीने अधिक जोर पकडला.

बाजी सारख्या अनेक शहीदांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा आज स्वैराचार म्हणून होत असलेला वापर पाहून ह्या महान शहिदांचे बलिदान व्यर्थ तर जात नाहीये ना हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही ! राष्ट्रगीत व राष्ट्रगान म्हणण्यावरून ह्या देशात विरोध व चर्चा घडवाव्या लागतात हे ह्या शहिदांचे दुर्दैव आहे असेच म्हणावे लागेल.


१३ वर्षीय बाजी राउत व त्यासोबत शहीद झालेले लक्ष्मण मलिक, फागू साहू, हर्षी प्रधान, नाता मलिक यांना शत शत नमन !  

Comments

Popular

नितिन गडकरी बीफ एक्सपोर्ट विवाद क्या है ? तथ्यों के साथ समझे !

  नितिन गडकरी बीफ एक्सपोर्ट विवाद क्या है ? तथ्यों के साथ समझे ! गडकरी परिवार, रेम्बल एग्रो और मिथ्र इंटरनेशनल: चार्ट के अनुसार संबंध और विवाद ! हाल ही में सोशल मीडिया और कुछ मीडिया रिपोर्ट्स में नितिन गडकरी के परिवार से जुड़ी कंपनियों और बीफ (भैंस मांस) निर्यात कारोबार को लेकर चर्चा तेज हुई है ! विपक्ष ने इसे अपना हथियार बनाकर नितिन गडकरी के साथ ही भाजपा को निशाना बनाना शुरू किया है ! निर्भिड ने अपने तरीकेसे इस मुद्दे को समझा और वाचकों को निष्पक्षता से समझाने हेतु यह लेखप्रपंच किया है ! सबसे पहले फ्लो चार्ट को देखिये और समझने की कोशिश कीजिये !  क्या भारत गोमांस निर्यात करता है ? तो आपको यह स्पष्ट रूपसे स्पष्ट करते हुवे हम कहते है की नहीं भारत गोमांस निर्यात नही करता ! लेकिन FY 2024-25 में भारत ने लगभग  12,54,775 टन (1.25 मिलियन टन)  भैंस का मांस निर्यात किया ! इसकी कुल कीमत लगभग  $4.06 बिलियन  थी। लेकिन निर्भिड यह पूछना चाहता है की अगर यही सारे सबंध किसी गैर भाजपा मंत्री के होते तो भाजपा और तथाकथित गोरक्षक संघटनाये  इस मुद्दे को राजनितिक फायदे के लिए...

नाशिककर सावध व्हा !

  नाशिककर सावध व्हा ! भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात येणाऱ्या मध्य प्रदेश मधील इंदोर शहरातील भागीरथपुरा भागात आतापर्यंत ड्रेनेजयुक्त पाणी पिल्यामुळे १६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ! ११०० वर आजारी असल्याची नोंद करण्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे !  गेल्या अनेक दिवसापांसून येथील नागरिक दुषित पाण्याची तक्रार सबंधित विभागाकडे करत होते परंतु अत्यंत कार्यक्षम अशा मुर्दाड प्रशासनाने त्याची दखल काही घेतली नाही ज्यामुळे आज इतकी मोठी किंमत तेथील नागरिकांना चुकवावी लागली आहे ! ह्या प्रशासकीय हत्येला दाबण्यासाठी मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला  २ लाख रु. देवून व ४-५ अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्याचा फार्स करून वातावरण शांत करण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न करण्यात आला आहे व त्यात राज्य सरकार नक्कीच यशस्वी होईल यात मला शंका नाही ! कारण भारतीय समाज मानसिकता हि कसाई खान्यातील खुराड्यात कत्तलीसाठी कोंबलेल्या कोंबड्यासारखी आहे ! जोपर्यंत दुसऱ्या कोंबडीची मान मोडली जात आहे तोपर्यंत खुराड्यातील प्रत्येक कोंबडी स्वतःला सुरक्षित समजत असते व डोळे बंद करून शांतपणे दाणे टिप...

मत कोणाला ?

  मत कोणाला ? दुर्जन होतील शिरजोर । आपुल्या मताचा मिळता आधार । सर्व गावांस करितील जर्जर । न देता सत्पात्री मतदान ॥ - तुकडोजी महाराज - प्रत्येक विवेकशील व सुज्ञास पडलेला गंभीर असा प्रश्न ! कि मत कोणाला ? चला मी तुमची थोडी मदत करतो ! आणि हो महत्वाचे म्हणजे हा लेख विवेकशील व सुज्ञ मतदारांसाठी आहे ! जात - धर्म - पंथ - प्रांत - भाषा अशा अनेक पशुतुल्य पाखंडी अस्मितांच्या आधारावर मतदान करणारे माझ्या लेखी विवेकशील व सुज्ञ नाही ! काही महत्वाची सूत्रे कायमची समजून घ्या ! राजकारण हा जगातील सगळ्यात गलिच्छ व्यवसाय असून त्याच्याशी सबंधित ९९ % लोक हे "सर्वअवगुणसंपन्न" भ्रष्ट आहे ! आपल्याला कमीत कमी "सर्वअवगुणसंपन्न " व्यक्तीची निवड करावयाची आहे जी आपले कमीत कमी शोषण करेल ! आजचे प्रमुख पक्ष म्हणजे कॉंग्रेस व भाजपा यांच्या जन्मदात्यांचे उद्देश कधीच धुळीस मिळाले असून आज  कॉंग्रेस जर ढोंगी धर्मनिरपेक्षतेच अपत्य आहे तर भाजपा पाखंडी राष्ट्रवादाच अपत्य आहे ! बाकीचे पक्ष हे कौटुंबिक मालकी हक्काचे प्रा.ली. मर्कटलीला कंपनी सारखे असून जास्त बहारदार फळे असलेला वृक्ष बघून ते इकडून तिकडे युत्या...